Skip to main content
मंगळवेढा पोलिसांच्या रडारवर वाळूचोर
जुलै महिन्यात ३४  वाहनावर २७ लाखांची दंडात्मक कारवाई
       पाच युवा पोलिस अधिकाऱ्यांकडून कारवाईचा धडाका  
मंगळवेढा:
       अवैद्य वाळू उपसा व क्षमतेपेक्षा ज्यादा वाळू वाहतूक करणाऱ्या ३४  वाहनावर  मंगळवेढा पोलीसांनी जुलै महिन्यात कारवाई करून २७ लाखांचा दंड वसूल केला आहे तसेच ३६४ ब्रास वाळू जप्त केली आहे व  ६ जणांवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत, वाळूबरोबर दारू,जुगार,मटका,अवैद्य प्रवासी वाहतूक  यावारही  कारवाई ची मोहीम तीव्र केल्याने अवैद्य व्यवसायिकांचे  धाबे दणाणले आहेत.
     मंगळवेढा  पोलीस ठाण्यात पोलिसनिरीक्षक शिवाजीराव शिंदे यांच्यासह  सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर,महेश विधाते,पोलिस उपनिरीक्षक शाहूराज दळवी, दत्तात्रय पुजारी,प्रकाश उमाप हे ५ युवा पोलिस अधिकारी कार्यरत आहेत या पाचही अधिकार्यांनी तालुक्यातील  अवैध्य व्यवसायकांवर हंटर उगारला आहे.पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू ,उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप जगदाळे, पो.नि शिवाजीराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  स.पो.नि सचिन हुंदळेकर, शाहूराज दळवी, दत्तात्रय पुजारी यांच्याबरोबर  पोलिस कर्मचार्यांनी भीमा व माण नदीतून होणारा अवैद्य वाळू उपसा व अवैद्य वाळू वाहतूकीवर कारवाईची मोहीम तीव्र केली आहे.जुलै महिन्यात ३४  वाहनावर कारवाई करून २ ७ लाखांचा दंड वसूल केला आहे तर ६  जणांवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत.नदीकाठच्याभागात रात्रीची गस्त वाढवून वाळू चोरांना सळोकीपळो करून सोडले आहे,वाळूबरोबर दारू,जुगार अड्यावर छापे टाकून अवैध्य व्यवसायिकांच्या मुसक्या आवळल्या आहेत सडकछाप मजनुनांही चांगलाच चोप देण्याचे काम पोलिस अधिकाऱ्यांकडून होत असल्याने छेडछाडीच्या प्रकाराला आळा बसत आहे.पोलिस अधिकाऱ्यांच्या कारवाईच्या मोहिमेने हम करे सो कायदा या गुर्मीत वावरणाऱ्या भुरट्या दादांचेही धाबे दणाणले आहेत,या युवा पोलिस अधिकाऱ्यांच्या कामगिरीने नागरीकातून समाधान व्यक्त होत आहे.       

Comments

Popular posts from this blog

*दिपावळी च्या तुम्हाला व परिवाराला खूप खूप शुभेछा* *हि दिपावळी खूप आनंदमयी,* *आरोग्यदायी,* *सुखमय,* *वैभवशाली,जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना